आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीचा कर वेळेत न भरल्याने सरपंच, उपसरपंचासह संपूर्ण सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- ग्रामपंचायतीचा कर वेळेत न भरल्याने सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांच्या अंगाशी आले आहे. यावल तालुक्यातील निमगाव-टेंभी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचसह सर्व नऊ सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. कर देयक मिळाल्यापासून 90 दिवसांत भरणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

निमगाव- टेंभी ही नऊ सदस्य संख्या असलेली ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंच उज्वला प्रदीपसिंह पाटील तर उपसरपंच प्रमोद हरिदास तावडे तसेच सदस्य रूपाली दिलीप चौधरी, निशा शेखर तायडे, कविता धनराज तावडे, संजय चंद्रकांत तावडे, कविता संजय तावडे, दिलीप कडू पाटील व उज्वला विरेंद्रसिंग पाटील हे एकूण नऊ सदस्य होते. या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीला देणे असलेला कर मुदतीत भरणे अपेक्षीत होते. मात्र, सदस्यांनी कर वेळत भरला नाही. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ह) प्रमाणे या सर्वांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात अपात्रतेची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान सरपंचसह सर्व सदस्यांना ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलमानुसार त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कर थकवल्यामुळे अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची वेळ ग्रामपंचायत सदस्यावर आली आहे. आता कर चुकवेगिरी नको रे बाबा!!!, असा सूर इतर सदस्यांतून निघत आहे.

बातम्या आणखी आहेत...