आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ लाख अाणि मोदी सरकारवर बोललोच नाही; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गडकरींचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काही दिवसांपूर्वी एका कॉमेडी शोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आश्वासनांबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, 'सत्तेत येणार नाही, असा आम्हास विश्वास होता. यामुळे आम्ही मोठमोठी आश्वासने दिली.' त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही ट्विट करून स्पष्टीकरणात गडकरी म्हणाले, मी मोदी सरकार किंवा १५ लाख रुपयांचा उल्लेख केला नव्हता. माझे वक्तव्य महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात होते. 


मराठी कधीपासून कळू लागली
गडकरी म्हणाले, तो कार्यक्रम मराठीत होता. राहुल गांधी यांना कधीपासून मराठी कळू लागली. त्यांनी एखाद्या जाणकारांकडून वक्तव्य समजून घ्यायला हवे होते. 


काय म्हणाले होते गडकरी :
मकरंद अनासपुरे यांच्या शोमध्ये गडकरी आणि नाना पाटेकर सहभागी झाले होते. प्रश्नोत्तरांदरम्यान गडकरी म्हणाले होते की, 'आयुष्यात कधीच सत्तेत येणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास होता. यामुळे आमच्या जवळचे लोक म्हणायचे, तुम्ही तरी बोला. आश्वासने द्या. त्याने काय बिघडेल? तुमच्यावर कोणती जबाबदारी येईल? मात्र, नंतर खरेच जबाबदारी आली.

 

#WATCH: Union Minister Nitin Gadkari clarifies on his earlier reported statement that 'BJP overpromised in 2014 elections'. pic.twitter.com/WCDkYiqSZf

— ANI (@ANI) October 10, 2018

 

बातम्या आणखी आहेत...