आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितना दिलासा नाहीच; विनंती याचिका हायकोर्टाने फेटाळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट 2008 या खटल्याच्या विशेष एनआयए न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.  या खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. 

 

मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणी आपल्यावर यूएपीए म्हणजे बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करताना विहित पद्धत अवलंबली गेली नसल्याचा आरोप कर्नल पुरोहित यांनी केला आहे. आपण सैन्यदलातील अधिकारी असल्याने आपल्यावर गुन्हे दाखल करण्यापूर्वी भारतीय सैन्यदलाची परवानगी घेतली जाणे आवश्यक होते. मात्र, ती घेतली गेली नसल्याने माझ्यावर यूएपीएअंतर्गत दाखल केलेले गुन्हे बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला होता. यासाठी विशेष न्यायालयातील सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली होती. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालावे, असे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने पुरोहित यांची याच आशयाची याचिका फेटाळून लावली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यानही उच्च न्यायालयाने आपल्या जुन्याच निर्णयावर कायम राहत स्थगितीस नकार दिला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...