आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडाळ्यात ऑईल टँकरला भीषण आग..चालकाचा होरपळून मृत्यू, मृतदेहाचा झाला कोळसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दक्षिण मुंबईतील वडाळ्यातील भक्ति पार्कसमोर भरधाव ऑईल टँकरला भीषण आग लीजली. टायर फुटल्याने टॅंकर उलटताच भीषण आग पसरली. यात टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

 

अपघात सोमवारी (ता.26) रात्री 10 वाजून 45 मिनिटाला झाला. टँकर चालकाचे नाव प्रताप मोरे (50) असे सांगितले जात आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या पोहोचल्या. दोन तासांची कसरत केल्यानंतर टँकरच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांन यश आले.

 

फायर ब्रिगेड अधिकारी एएच सावंत यांनी सांगितले की, टॅंकरमध्ये मिथेनॉल भरले होते. टँकर रस्त्यावर उलटताच त्याला भीषण आग लागली. ट्रकच्या कॅबिनमधून एक जळीत मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मृतदेहाचा अक्षरश: कोळसा झाला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...