Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Old Man Died In Road Accident in Yawal

यावल शहराला अतिक्रमणाचा विळखा..अपघातांची मालिका सुरुच, एकाला ट्रकने चिरडले

प्रतिनिधी | Update - Dec 06, 2018, 02:13 PM IST

अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्ग अतिक्रमाच्या विळख्यात सापडला आहे.

 • Old Man Died In Road Accident in Yawal

  यावल- भुसावळकडून यावल शहरात येत असलेल्या भरधाव ट्रकने एका पादचारीस चिरडले. गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भुसावल टी पॉइंटवर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दिलीप बाबुराव बिरारी (वय-50, रा. सुदर्शन चौक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

  शहरातून जाणारा अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्यमार्ग अतिक्रमाच्या विळख्यात सापडला आहे. पावसाळ्यानंतर सदरील अधिक्रमण काढणार, अशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही. परिणामी वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचारी लोकांना अपघाताच्या सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे भुसावळ टी पॉइंटजवळ देखील रस्त्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमनाचा वेढा असल्याने व वाहने थांबत असल्याने हा चौक मृत्युचा सापळा ठरला आहे. गुरुवारी सकाळी याच प्रत्यक्ष अनुभव एका 50 वर्षीय इसमाचा बळी जाऊन समोर आला आहे. भुसावळकडून येणारा ट्रक (एम.एच.30 ए.बी.-4934) हा यावलला येत असताना भुसावळ टी पॉईंटवर येथील सरस्वती विद्यालया जवळील रहिवासी दिलीप बाबुराव बिरारी हे रस्त्याने येत असताना ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. दिलीप बिरारी ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर भुसावळ येथील आरोग्य वाहिनी डॉ.अंशिजा पाटील, चेतन भोईटे यांनी जखमीस तात्काळ जळगावला उपचारासाठी हलवले. दरम्यान उपचार सुरू असताना दहा वाजेच्या सुमारास त्यांचा जळगाव येथे मृत्यू झाला.

  भुसावळ टी पॉइंटवर वळण असल्याने आणि शहरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. अपघाताची खबर प्रकाश मधुकर बिरारी दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर हवालदार संजय तायडे करीत आहे

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

 • Old Man Died In Road Accident in Yawal
 • Old Man Died In Road Accident in Yawal

Trending