आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादर येथील फूल मार्केटमध्ये गोळीबार..एकाची हत्या; मनोज मौर्या असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दादर येथील फूल मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गोळीबार करुन एकाची हत्या करण्यात आल्याचे खळबळ उडाली आहे. मनोज मौर्या असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोर्या हे फूल मार्केटमध्ये वजन काटा पुरविण्याचे काम करत होते.

 

मिळालेली माहिती अशी की, दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात मारेकऱ्यानी दादर पश्चिम परिसरातील फुल मार्केटमध्ये एका इमारतीजवळ मनोज मोर्या यांच्यावर गोळी झाडली. जखमी अवस्थेत मनोज मोर्या यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोळीबार केल्यानंतर मारेकरी फरार झाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना परिसर सील केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस मारेकर्‍यांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...