Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | One Sided Love Girls Brother killed in Khailanji Nagpur

एकतर्फी प्रेम..तरुणाने तरुणीच्या भावाच्या छातीवर काचेने वार करून केली हत्या; खैरलांजीतील घटना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 05:15 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या भावाच्या छाती आणि मानेवर काचेने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. नागपुरात खैरला

  • One Sided Love Girls Brother killed in Khailanji Nagpur

    नागपूर- एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या भावाच्या छाती आणि मानेवर काचेने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. नागपुरात खैरलांजी येथे गुरुवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. अमोल मेश्राम असे हत्या झालेल्या तरुणाचे तर सूरज पाटील असे आरोपीचे नाव आहे.

    मिळालेली माहिती अशी की, कुही तालुक्यातील खैरलांजी गावात गुरुवारी मध्यरात्री हे हत्याकांड घडले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सूरज पाटील याचे अमोल मेश्रामच्या धाकड्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. सूरज पाटीलने तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी मागणीही घातली होती. परंतु मेश्राम कुटुंबीयांनी सूरजची मागणी फेटाळत मुलीचा विवाह मे 2018 मध्ये महाराष्ट्राबाहेर लावून दिला होता. याच रागातून सूरजने अमोलची हत्या केली.

    सूरजने अमोलसोबत वाढवली होती मैत्री
    काही दिवसांपूर्वी सूरजने अमोलसोबत मैत्री वाढवली होती. सूरजने गुरुवारी रात्री अमोलला अति दारु पाजली. त्याच अवस्थेत सूरजने काचेच्या टोकदार तुकड्याने अमोलच्या छाती आणि मानेवर वार केले. अमोलचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी आरोपी सूरज पाटील याला अटक केली आहे.

Trending