आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप अामदाराच्या भावाला चार लाखांचा अाॅनलाइन गंडा; क्रेडिट कार्डची माहिती केली हॅक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड शहराचे भाजप अध्यक्ष व अामदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप यांचे अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्ड हॅक करून अज्ञाताने ५६२६.६ अमेरिकन डाॅलर (४ लाख २७ हजार) रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. 


याप्रकरणी जगताप यांनी अज्ञात अाराेपीविराेधात सांगवी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली अाहे. शंकर जगताप यांच्याकडे अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्ड अाहे. २० सप्टेंबर राेजी रात्री त्यांच्या सदर क्रेडिट कार्डच्या खात्यातून चार लाख २७ हजार रुपये परस्पर ऑनलाइन काढून घेण्यात आले. याबाबतचा एसएमएस आल्यानंतर जगताप यांनी तातडीने पाेलिसांत तक्रार दिली. त्यानुसार तपास सुरू आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...