आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपटामुळेच सुटला या मर्डर मिस्ट्रीचा गुंता...पत्नीनेच केली होती पतीची निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिशिगन- अमेरिकेतील मिशिगन शहरातील एक अनोखी घटना समोर आली आहे. पत्नीनेच पतीची गोळी घालून हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु या घटनेचा कोणी पुरुष साक्षीदार नाही तर कुटुंबातील पाळीव पोपट होता. 

 

2015 मध्ये मिशिगनमध्ये 49 वर्षीय ग्लेना डुरम या महिलेने तिचा पती मार्टिन डुरम याची गोळ्या घालून हत्या केली होती. नंतर ग्लेनाने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. ग्लेनाने पतीची हत्या केली तेव्हा घरात कोणीच नव्हते. मात्र, तिचा पतीची हत्या करताना घरातील पाळीव पोपटाने पाहिले होते. या पोपटाचे नाव 'बड' असे आहे. हत्येनंतर तो सारखा, 'Don't Shoot' असे उच्चारत होता.

 

मृत मार्टिनच्या आईने सांगितले की, 'बड' जे काही ऐकतो, पाहातो ते वारंवार बडबडतो. यावेळी बड हा मार्टिन याने शेवटचे उच्चारलेले शब्द बडबडत होता. मात्र, पोपटाला कोर्टाच्या कार्यवाहीत सहभागी करून घेण्यात आले नाही. पोपटाचे शब्द पुरावा म्हणून पोलिसांनी कोर्टात सादर केले. ग्लेना हिला पुढील महिन्यात कोर्ट शिक्षा सुनावणार आहे.

बातम्या आणखी आहेत...