इंटरनॅशनल मीडियाने दिली / इंटरनॅशनल मीडियाने दिली होती 'सेक्स गुरु' ही उपाधी.. असा होता ओशो यांचा जीवनप्रवास

  • ओशो हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. 1960 च्‍या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून त्‍यांनी भारतभर प्रवास केला.

Dec 11,2018 01:00:00 AM IST

पुणे- एका लहानशा गावात जन्‍माला आलेला मुलगा जगभरात नावलौकिक करतो, अशा ओशांचा 11 डिसेंबर हा जन्‍मदिवस. या अनुषंंगाने आम्ही आपल्यासाठी काही दुर्मिळ फोटोंमधून ओशो यांच्या जन्‍मापासून ते मृत्‍यूपर्यंतचा जीवनप्रवास घेऊन आलो आहे.

एक नजर ओशो यांच्‍यावर...
ओशो रजनीश यांचा जन्‍म मध्यप्रदेशातील रायसेन जिल्‍ह्यातील कुचवाडा या गावात झाला होता. ओशो हा शब्द लॅटिन भाषेतील शब्द ओशोनिक या वरून घेण्‍यात आला. त्‍याचा अर्थ समुद्रात सामावून जाणे असा केला जातो. 1960 पासून आचार्य रजनीश म्हणून, 1970 व 1980 च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून आणि 1989 पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो हे आध्‍यात्मिक शिक्षक होते.

'सेक्‍स गुरू' उपाधी
ओशो हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. 1960 च्‍या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून त्‍यांनी भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्तही ठरले. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली.

मुंबईमध्‍ये जमविले शिष्‍य
1970 मध्ये ओशो काही काळासाठी मुंबईमध्‍ये थांबले होते. येथे त्‍यांनी शिष्‍य जमविण्‍यासा सुरूवात केली. आध्‍यात्‍मिक शिक्षक म्‍हणून आपली भूमिका बजावण्‍यास त्‍यांनी येथूनच सुरूवात केली. पुण्यात जाऊन 1974 मध्‍ये त्‍यांनी आश्रमाची स्थापना केली. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला.

पुढील स्‍लाइड्सवर दुर्मिळ फोटोंमधून पाहा ओशो यांचा जन्‍मापासून ते मृत्‍यूपर्यंतचा जीवनप्रवास...

X