Home | Maharashtra | Mumbai | physically assaulted and molested with 3 school children at Mumbai antop hill Area

चाकूचा धाक दाखवून 3 अल्पवयीन मुलांना नेले पडीक घरात, नंतर केले लैंगिक शोषण, अॅण्टॉप हिल भागातील घटना

दिव्य मराठी | Update - Dec 08, 2018, 04:13 PM IST

पीडित मुले 10 ते 12 वर्षे वयोगटातील असून वडाळ्यातील अॅण्टॉप हिल परिसरात राहतात.

  • physically assaulted and molested with  3 school children at Mumbai antop hill Area

    मुंबई- अॅण्‍टॉप हिल परिसरात 3 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. एका अज्ञात भामट्याने पीडित मुलांना चाकूचा धाक दाखवून एका पडीक घरात नेले. नंतर तिघांवर अत्याचार केला. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुले 10 ते 12 वर्षे वयोगटातील असून वडाळ्यातील अॅण्टॉप हिल परिसरात राहतात. मुले गुरुवारी (ता.6) घरापासून काही अंतरावर खेळत होती. यवेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने मुलांना चाकूचा धाक दाखवत जवळील पडीक घरात नेले आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलांनी घरी आल्यानंतर त्यांच्या पालकांना झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending