आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या \'त्या\' अपघातास पायलट जबाबदार..अतिरिक्त वजन असूनही उड्डाणाच्या प्रयत्नामुळेच हेलिकॉप्टर कोसळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लातूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघातास पायलट जबाबदार असल्याचे विमान दुर्घटना पथकाने दिलेल्या अंतिम अहवालात म्हटले आहे. अतिरिक्त वजन असूनही पायलटने उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

दरम्यान, 26 मे 2017 रोजी लातूरमधील निलंग्यात मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह आणखी तीन प्रवासी आणि दोन क्रू मेंबर होते. सर्वजण थोडक्यात बचावले होते. लातूरहून मुंबईला येण्यासाठी टेकऑफ करताना हायटेंशन वायरला धक्का लागल्याने हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले होते.

 

यामुळेच हेलिकॉप्टर कोसळले..

अतिरिक्त वजनासह पायलटने हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हेलिकॉपटर जमिनीपासून काही उंचीवर जाताच ते कोेसळले, असे अहवालात स्पष्‍ट करण्‍यात आले आहे. यावेळी प्रवासी, सामान, इंधनासह हेलिकॉप्टरने वजनाची मर्यादा ओलांडली होती. पायलटने मोजलेले वजन 4,940 किलो होते. परंतु न मोजलेल्या 72 किलो वजनाच्या सामानासह हेलिकॉप्टरचे एकूण वजन सुमारे 5072 किलोंवर पोहोचले होते, असे अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

 

मुख्यमंत्री निलंग्याच्या दौऱ्यावर होते. त्या दिवशी त्यांनी हलगरा येथे श्रमदान केले. औराद शहाजानीच्या शासकीय विश्रामगृहावर जेवण घेतले अन् निलंग्यात पोहोचून हेलिकॉप्टरने लातूरकडे निघाले होते. दुपारी त्यांचे हेलिकॉप्टर निलंगा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मैदानातून आकाशात झेपावले. सुमारे शंभर दीडशे फूट उंचीवर पोहोचताच या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. काही क्षणातच ते जमिनीच्या दिशेने वेगाने आले अन् मैदानावर कोसळले.

 

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने घर पाडले; ‘प्रहार’ने उभारले
दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच ते खाली पडल्याची घटना निलंग्यात घडली होती. या घटनेत मुख्यमंत्र्यांसह सर्वच बचावले. परंतु मैदानाशेजारच्या भरत कांबळे यांच्या घराजवळ हेलिकॉप्टर पडल्याने त्यांच्या घराची चांगलीच पडझड झाली होती. प्रशासनाने त्यावेळी कांबळे कुटुंबीयांची तात्पुरती व्यवस्था केली, परंतु त्यांच्या घराची नुकसानभरपाई त्यांना मिळाली नाही. ही बाब प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना कळाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन कांबळेंचे घर दुरुस्त करून दिले. गुरुवारी या घराचा ताबा समारंभपूर्वक कांबळे कुटुंबीयांना देण्यात आला.

 

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळताना त्याच्या पात्यांचा फटका शेजारीच असलेल्या भरत कांबळे यांच्या घराला बसला. त्यानंतर हेलिकॉप्टरचा काही भागही त्यांच्या घरावर आदळल्याने कांबळेच्या घराची बऱ्यापैकी पडझड झाली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...