आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध पक्ष : या विधीनुसार घरातच सोप्या पद्धतीने पितरांना करू शकता प्रसन्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील ज्या तिथीला पूर्वजांची श्राद्ध तिथी असेल त्यादिवशी पितरांच्या संतुष्टीसाठी विधिव्रत श्राद्ध करावे. परंतु काही कारणास्तव तुम्हाला श्राद्ध करणे शक्य नसल्यास येथे सांगण्यात आलेल्या सोप्या विधीनुसार तुम्ही श्राद्ध करू शकता.


असे करावे पिंडदान
महाभारतानुसार श्राद्धामध्ये तीन पिंडाचे विधान आहे. त्यामधील पहिले पिंड पाण्यात अर्पण करावे. दुसरे पिंड श्राद्धकर्ताच्या पत्नीला द्यावे आणि तिसरे पिंड अग्नीला द्यावे. जे लोक या नियमांचे पालन करतात त्यांच्यावर पितरांची सदैव कृपादृष्टी राहते.


- सकाळी उठून स्नान करून देव स्थान आणि पितृ स्थान गाईच्या शेणाने सारवून गंगाजलाने पवित्र करा. घराच्या अंगणात रांगोळी काढावी.


- महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे. ब्राह्मणाला आमंत्रण देऊन पितरांची पूजा, तर्पण करून घ्यावे.


- पितरांसाठी अग्निमध्ये खीर अर्पण करावी. गाय, कुत्रा, कावळा आणि अतिथीसाठी जेवणातील घर घास वेगळे काढून ठेवावेत.


- ब्राह्मणाला आदरपूर्वक जेवू घालावे. वाटर, दक्षिण देऊन तृप्त करावे. ब्राह्मण गृहस्थ आणि पितरांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत.


- पहिले पिंड जे पाण्यामध्ये जाते ते चंद्रदेवाला तृप्त करते आणि चंद्र स्वतः देवता आणि पितरांना संतुष्ट करतात.


- अशाप्रकारे पत्नी गुरुजनांच्या आज्ञेने दुसरे पिंड ग्रहण करते, यामुळे पितर प्रसन्न होऊन पुत्राची इच्छा असणाऱ्या पुरुषाला पुत्र प्रदान करतात.


- तिसरे पिंड अग्नीमध्ये टाकले जाते, यामुळे पितर तृप्त होऊन व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...