आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Has Less Than Rs 50,000 Cash In Hand, Owns Assets Worth Rs 2.28 Crore

नाही बंगला..नाही कार, पंतप्रधानांकडे केवळ 50 हजार रुपये कॅश; तरीही कोट्याधीश आहेत नरेंद्र मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात स्वत:ला 'फकीर' म्हणवून घेतात. मा‍त्र, त्यांच्या मालमत्तेबाबत पीएमओने माहिती जाहीर केली आहे. मोदींकडे 31 मार्च 2018 पर्यंत एकूण 2 कोटी 30 लाख रुपये जंगम व स्थावर मालमत्ता आहे.

 

पीएमओद्वारा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मोदींकडे 48, 944 रुपये रोख रक्कम आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत मोदींकडील रोक रकमेत 67 टक्के घट झाली आहे. मागील वर्षी मोदींकडे दीड लाख रुपये रोख रक्कम होती. विशेष म्हणजे मोदींच्या नावावर कोणत्याही बॅंकेचे कर्ज नाही.

 

गुजरातमधील गांधीनगर येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एनएससीएच शाखेत 11 लाख तीन हजार रुपये डिपॉझिट आहे. याशिवाय याच बॅंकेत मोदींनी 1 कोटी 7 कोटी रुपये फिक्स्ड ‍‍डिपॉझिटही आहे.

 

पंतप्रधान मोदींनी 2012 मध्ये एका इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डमध्ये 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. याशिवाय मोदींनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 5 लाख 2 हजार रुपये, 1 लाख 6 हजार रुपये लाईफ इन्शुरन्स पॉलिसीत गुंतवले आहे. मोदींकडे 1 लाख 38 हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत.

 

पंतप्रधान मोदींनी 2002 मध्ये एक लाख रुपयांच्या किमतीत 3531.45 स्क्वेअर फुटाची संपत्ती खरेदी केली होती. मोदींकडे एकही कार नाही. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी एकही सोन्याचा दागिना खरेदी केला नाही.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे किती आहे मालमत्ता?

 

बातम्या आणखी आहेत...