पंतप्रधान मोदी रविवारी / पंतप्रधान मोदी रविवारी नागपुरात..छिंदवाडा येथे जाहीरसभेला संबोधित करणार

प्रतिनिधी

Nov 15,2018 04:51:00 PM IST

नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 नोव्हेंबर रोजी नागपुरात येणार आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आयोजित जाहीरसभेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांचा काही काळ नागपुरात थांबणार आहेत.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छिंदवाडा येथे जाहीरसभेला संबोधित करणार आहेत. त्यासाठी मोदी रविवारी नागपुरात येणार असून काही काळ ते विमानतळावरच थांबणार आहेत. नंतर तेथून ते हेलिकॉप्टरने छिंदवाडा येथे रवाना होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींच्या आगमनप्रसंगी त्यांचे विमानतळावर भाजपच्या वतीने स्वागत केले जाणार आहे.

X
COMMENT