आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार कुपोषण मुक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी म्हणाले...प्रसिद्ध चौधरी चहा घेण्यासाठी नंदुरबारला यायचो

 

नंदुरबार- 'हर घर पोषणआहार त्योहार' अंतर्गत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

 

राज्यातील सर्वाधिक कुपोषणग्रस्त भागापैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा, वाहणार्‍या नर्मदा नदीवरील बोट अॅम्ब्युलन्समध्ये (तरंगते रुग्णालल) काम करणार्‍या आरोग्य सेविका अंजना परमार यांच्याशी यावेळी पंतप्रधानांशी संवाद साधला.

 

आपल्या संवादादरम्यान परमार यांनी या भागातील दुर्गभ भागाबाबत अवगत करत अशा विपरीत परिस्थिती आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे गरोदर माता आणि बालकांवर उपचार करत आहेत याबाबत माहिती दिली. रोज दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करणार्‍या  हिला कर्मचार्‍यांचे मोदींजींनी अभिनंदन केले. यावेळी बोलताना मोदी यांनी सातपुडा पर्वत रांगातील अंधश्रद्धेचे जाळे दूर करत आधुनिक विज्ञान घरोघरी पोहचवणार्‍या आरोग्य यंत्रणेतील महिला कर्मचार्‍याच्या कामाला शाबासकीची पावती दिली. यावेळी नंदुरबारच्या महिला कर्मचार्‍यांशी संवाद साधताना त्यांनी सुरुवातीला मराठीतून 'आपण कसे आहात आणि गणपती उत्सवाची तयारी कशी सुरु आहे', याबाबत विचारणा केली.

 

नंदुरबारमधील प्रसिद्ध असलेला चौधरी चहा घेण्यासाठी आपण नंदुरबार यायचो, याचा मोदींनी आवर्जुन उल्लेख केला. नंदुरबार मधल्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या संवादानंतर आपल्या कामांचा स्वरुप अधिक वाढले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कॉन्फरन्सदरम्यान केलेल्या मानधन वाढीच्या घोषणेने सागळ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...