Home | Maharashtra | Vidarva | Akola | Police Constable Suicide in Pusad Police Station

पुसद : पोलिसाची मानसिक तणावातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Aug 30, 2018, 07:56 AM IST

पुसद येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलने बुधवारी सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली.

  • Police Constable Suicide in Pusad Police Station

    पुसद- येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:जवळील पिस्तुलामधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अनिस पटेल असे मृत पोलिसाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. आत्महत्येच्या ठिकाणी त्यांचे पिस्तूलही आढळून आले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी पिस्तूल ताब्यात घेतले आहे.


    दिग्रस येथील अनिस पटेल यांची १५ दिवसांपूर्वी पुसद इथे नियुक्ती झाली होती. ते सीआरपीमध्ये प्रमुख होते. बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांनी मुख्यालयाच्या सभागृहाच्या मागील बाजूच्या भिंतीजवळ स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. मोठा आवाज आल्याने काही कर्मचारी पाठीमागे गेले असता पटेल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ पटेल यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पटेल हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. दरम्यान, अनिस पटेल यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेची माहिती अनिस यांच्या कुटुंबीयांना दिल्यानंतर अनिस यांचे कुटुंबीय पुसदला आले.

Trending