आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराची तक्रार होताच फौजदाराने केली अात्महत्या:पुण्यात रेल्वेखाली उडी घेऊन संपवली जीवनयात्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक साजन सानपविरुद्ध नाशकात साेमवारी जेल रोड भागातील एका शिक्षिका असलेल्या महिलेने उपनगर पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे बदनामीच्या भीतीने सानपने मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास पुण्यात रेल्वेखाली उडी घेऊन अात्महत्या केली. विशेष म्हणजे, तक्रारदार पाेलिस ठाण्यात पाेहाेचताच सानपही तिथे अधिकाऱ्यांशी चर्चा करीत हाेता. मात्र, गुन्हा दाखल हाेत असल्याचे बघून त्याने काढता पाय घेतल्याची चर्चा पाेलिस वर्तुळात सुरू अाहे.


पीडितेच्या तक्रारीनुसार, पतीच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. घरात स्वयंपाक करताना कुकरचा स्फोट झाल्याने पीडितेचा चेहरा भाजला. तेव्हा तिला पाहण्याच्या निमित्ताने सानप घरी आला. नंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले. सानपने महिलेला पतीविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे काही खासगी छायाचित्रे असून ते सार्वजनिक करण्याची धमकी देत सानपने २ जून २०१४ ते ४ ऑक्टोबर २०१८ या काळात तिच्यावर अत्याचार केले. नंतर पीडितेने हा सर्व प्रकार पाेलिस अधिकारी असलेल्या पतीला सांगितला. महिलेने पुराव्यादाखल सानपचे फोनवर रेकाॅर्ड केलेले संभाषणही एेकवले. महिला व तिच्या पतीने सानपच्या पत्नीलाही हा प्रकार सांगितला. त्यानंतर सानपने एका पोलिस अधिकाऱ्याला साेबत घेऊन महिलेचे घर गाठून माफी मागितली. त्यानंतरही सानपने त्याचा मित्र गणेश आगवणेमार्फत पीडितेचा पाठलाग करून माहिती गोळा केली. त्याचा धमकी देण्याचा प्रकारही सुरूच होता. त्यामुळे पीडितेने सानप व त्याचा मित्र अागवणे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

माफीनाम्यानंतरही त्रास
माफीनाम्याला अाठवडा उलटत नाही ताेच सानपने पीडितेच्या शाळेत त्याचा मित्र अागवणेला भेटायला पाठवले. तू फक्त सानपचीच असून ताे अाता अधिकारी झाल्याने त्याच्या नवीन वर्दीला स्टार लावून दे, अशी त्याची मागणी असल्याचे आगवणेने तिला सांगितले. पीडितेने ‘माझा संसार माेडू नका, मला जगू द्या,’ अशी त्याला विनवणी केली. तरीही अागवणेने पुन्हा बदनामीची धमकी दिल्याने तिने वर्दीला स्टार लावून दिला. त्यानंतरही मैत्रिणीला पुन्हा फाेन करून सानपने तिची बदनामी केली, असा पीडितेचा दावा आहे.

 

बातम्या आणखी आहेत...