आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकास 2 लाखांची लाच घेताना पुण्यात अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नाशिक ग्रामीणमधील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश सदाशिव शिरसाठ (48) व पोलिस हवालदार संजीव खंडेराव आहेर यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दाेन लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक करून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत एसीबीकडे 38 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात नाशिकच्या दिंडोरी पोलिसांत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठच्या अखत्यारीत असून पोलिस हवालदार संजीव आहेर याबाबत चौकशी करत आहेत. सदर गुन्ह्यात तक्रारदाराविरोधात दिंडोरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वाँरंट काढले. मात्र, ती अटक टाळण्यासाठी शिरसाठने दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्याच्या वतीने या लाचेची रक्कम घेण्यासाठी हवालदार संजीव आहेर पुण्यातील मित्रमंडळ चौकातील हॉटेल नैवेद्यसमोर आला असताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. याबाबत पुढील तपास पोलिस उपअधीक्षक प्रतिभा शेंडगे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...