Home | Maharashtra | Mumbai | Prakash Ambedkar Asked Congress For 12 Seats In The 2019 lok Sabha Elections

पोलिस खाते 'भाजपचे विंग' म्हणून काम करतेय; प्रकाश आंबेडकरांचा गृहखात्यावर गंभीर आरोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 12:48 PM IST

राज्यातील पोलिस खाते सध्या भाजपचे विंग म्हणून काम करत आहे, अशा खोचक शब्दात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यां

 • Prakash Ambedkar Asked Congress For 12 Seats In The 2019 lok Sabha Elections

  मुंबई- राज्यातील पोलिस खाते सध्या भाजपचे विंग म्हणून काम करत आहे, अशा खोचक शब्दात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. मंगळवारी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  पोलिस खात्याने पुराव्याची कागदपत्रे भाजप नेत्यासमोर सादर करण्‍यापेक्षा कोर्टासमोर सादर करावे. मात्र, पोलिस खाते भाजपचे विंग म्हणून का काम करतेय, असा सवाल आंबेडकरांनी यावेळी उपस्थित केला. सादर केलेली कागदपत्रे खरी आहे की खोटी हे कोर्ट सिद्ध करेल, त्यामुळे पोलिस खाते महत्त्वाचे खाते आहे हे मानायला तयार नसल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.

  संघ आणि भाजपने समाजात निर्माण केलेली दरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून मिटवत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे. नोटबंदी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात येत्या काही दिवसांत जेलभरो आंदोलन करण्‍यात येणार असल्याचाही इशारा यावेळी आंबेडकरांनी दिला आहे.

  12 जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी..
  2019 मधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत तयारी करण्याची तयारी प्रकाश आंबेडकर यांनी दर्शवली आहे. परंतु, राज्यात 12 जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी करण्‍यात येईल, असेही ते म्हणाले.

Trending