आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्यारे बाळगण्यास परवानगी लागते..मोहन भागवतांवर मोक्काअंतर्गत कारवार्इ करा- प्रकाश आंबेडकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबर्इ- कोणाकडे शस्त्रे सापडली की त्याच्यावर अतिरेकी कायद्यांतर्गत कारवार्इ केली जाते. त्यानुसारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवार्इ करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेला शस्त्रसाठा पाेलिसांनी जप्त न केल्यास रस्त्यावर उतरून मोर्चा काढू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात यावा, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील अमरज्योत या ठिकाणी शांतता आंदोलन पुकारण्यात आले होते. हत्यारे बाळगण्यास पाेलिसांची परवानगी लागते. परवानगी नसेल अाणि तुमच्याकडे हत्यार सापडले तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो. सामान्य माणूस पोलिसांच्या परवानगीने  फक्त पिस्तूल वापरू शकतो. मग मोहन भागवत यांच्याकडे एके 47 बंदूक कोठून आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतका मोठा शस्त्रसाठा कसा अाला, याचा शाेध घेण्याची गरज आहे. परंतु, तो घेतला जात नाही. पोलिसांनी याची चौकशी न केल्यास न्यायालयाकडे धाव घेतल्याशिवाय राहणार नाही. संघाचा शस्त्रसाठा जप्त न केल्यास आम्ही राज्यातील रस्ते जाम करू, असा इशाराही आंबेडकर यांनी या वेळी दिला.

 

सरकार सध्या व्हेंटिलेटरवर  
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घटनात्मक पदावर विराजमान आहेत. या पदाचा अपमान होऊ द्यायचा नसेल तर ज्या संघटनांकडे शस्त्रे आहेत ती सर्व जप्त करायला हवी. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या तक्रारीची चौकशी करावी, अशी मागणी आंबेडकरांनी केली. सत्ता गेली तर काय अशी भीती आता संघाला वाटू लागली आहे. सरकार सध्या ऑक्सिजनवर असून चार राज्यांच्या निवडणुकानंतर ते व्हेंटिलेटरवर जार्इल, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

बातम्या आणखी आहेत...