Home | Maharashtra | Mumbai | Private Bank Vice President Missing, Car Found in Mumbai

HDFC बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी 3 दिवसांपासून बेपत्ता, रक्ताने माखलेली कार सापडली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 02:39 PM IST

खासगी बँकेचे अधिकारी बेपत्ता असून त्यांची रक्ताने माखलेली कार आढळल्याने खळबळ उडाली आहे.

  • Private Bank Vice President Missing, Car Found in Mumbai

    मुंबई- एचडीएफसी बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असून त्यांची रक्ताने माखलेली कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ संघवी हे कमला मिल परिसरातील एचडीएफसी बँकेतपदी कार्यरत होते.

    सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी रात्री ते ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे, घराकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिले होते. मात्र, ते घरी पोहोचलेले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा फोन लावून चौकशी करण्‍याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचा फोन स्वीचऑफ येत आहे. याप्रकरणी एन.एम.जोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    रक्ताने माखलेली कार सापडली..

    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिद्धार्थ संघानी यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. कार रक्ताने माखली आहे. त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय आहे. सिद्धार्थ संघवी यांचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

    पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सिद्धार्थ संघवी यांच्या कारचे फोटो

  • Private Bank Vice President Missing, Car Found in Mumbai
  • Private Bank Vice President Missing, Car Found in Mumbai

Trending