आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे अपघात.. \'त्या\' होर्डिंगच्या मालकाला अटक, कापणारे फरार; कंत्राट संपल्यानंतर ही उभे होते होर्डिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिवाजी नगर रेल्वे स्टेशनच्या समोरील सिग्नलवर जाहिरातीचे लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघांना जीव गमवावा लागला होता. ही घटना 5 ऑक्टोबरला घडली होती. या घटनेत आठ जण जखमी झाले होते. या घटनेत सिग्नलवर थांबलेल्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी  पुणे पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. होर्डिंगच्या मालकाला अटक करण्‍यात आली आहे.

 

अब्दुल मोहम्मद फकी असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला कोर्टात उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


कंत्राट संपल्यानंतर ही उभ होत होर्डिंग...
कंत्राट संपल्यानंतरही होर्डिंग उभे होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान होर्डिंगचा नवा कंत्राटदार बंकांपुरे आणि होर्डिंग कापणारे कर्मचारी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

 

पत्नीचे अस्थिविसर्जन करून परतणाऱ्या रिक्षाचालकाचा मृत्यू
मृत रिक्षाचालक शिवाजी परदेशी (40) यांच्या पत्नीचे गुरुवारी निधन झाले होते. शुक्रवारी ते कुटुंबीयांसह आळंदी येथे पत्नीच्या अस्थी विसर्जन करण्यास गेले होते. घरी परतताना ही दुर्घटना घडली.


चपळाईमुळे वाचले काही जण
होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळत असलेला लक्षात आला आणि या चार जणांनी अत्यंत चपळाईने पुढे धाव घेतली. शिवाय बरोबरच्या व्यक्तींनाही पुढे ढकलल्याने त्यांचेही प्राण वाचवण्याचे श्रेय त्यांना मिळाले.

 

शाहीर अमर शेख चौकात रेल्वेच्या जागेवर गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मोठ्या जाहिरातींसाठी फ्लेक्स होर्डिंगचे सांगाडे उभारण्यात आले होते. कॅप्शन्स आऊटडोअर जाहिरात कंपनीचे त्याचे कंत्राट होते. हा करार संपल्याने होर्डिंगचे लोखंडी सांगाडे शुक्रवारी सकाळपासून काढले जात होते. तीन होर्डिंगचे सांगाडे आधी काढण्यात आले. मात्र पाचव्या होर्डिंगचा सांगाडा उतरवताना त्याच्या मागील बाजूस दिलेला आधार अचानक निखळल्याने हा लोखंडी सांगाडा रस्त्यावर सिग्नलला उभ्या असलेल्या पाच ते सहा रिक्षा, एक दुचाकी व एका चारचाकी गाडीवर पडला. यात रिक्षातील तीन, तर दुचाकीवरील एक जण ठार झाला, तर 11 जण जखमी झाले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... जाहिरातीचे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताची भीषणता दाखविणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...