आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-रावेर बसला निल्लोड फाट्याजवळ भीषण अपघात.. पिकअपला धडकली; एक ठार, तीन गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वडोद बाजार- औरंगाबाद सिल्लोड महामार्गावरील निल्लोड फाट्याजवळ गुरुवारी दुपारी पाऊने तीन वाजेच्या सुमारास पुणे-रावेर जाणारी बस व नांदुरा (जिल्हा बुलढाणा) हुन औरंगाबादकडे जाणारा टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दहा जण जखमी झाल्याची घटना घडली.

 

गुरुवारी दुपारीपाऊने तीन वाजेच्या सुमारास औरंगाबाद सिल्लोड महामार्गावरील निल्लोड फाट्याजवळ पुणे हुन रावेर जाणारी बस व नांदुरा (जिल्हा बुलढाणा)हुन औरंगाबाद कडे जाणार  टेम्पो यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात केशव रामचंद्र ठाणे (वय45,  रा.खिंडोरा, ता. नायगाव, जि.बुलढाणा) हा जागेवर ठार झाला. अपघातात इतर 10 जण जखमी झाले आहेत. रामेशवर दादाराव गव्हाणे, ज्ञानेश्वर छगन पठाडे, प्रवीण भालेराव पाटील, रामकंबर भारद्वाज, रामजीत ललीमा भारद्वाज, सुनील प्रल्हाद अहिरवाल, गुलाबराव रामसीग जादूरे, साहेबराव बबनराव चोथमल, रामराव हिम्मतराव खमाट, अनिल भीमराव सपकाळ हे   दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात स्थळी नागरिकांनी मदत कार्य करू न जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... एसटी बस आणि पिकअपच्या अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...