आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भल्या मोठ्या अजगराने कोल्ह्यास गिळले खरे पण पाहा अशी झाली त्याची फजिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- दहिगावजवळ सावखेडासिम रस्त्यावर भल्या  मोठ्या अजगराने एका कोल्ह्यास अर्धवट गिळलेल्या अवस्थेत दिसल्याने खळबळ उडाली. मंगळवारी (दि.18) सकाळी ही घटना निदर्शनास आली. कोल्ह्याची शिकार करताना जखमी झालेल्या अजगरास कोल्हाला फस्त करणे शक्य झाले नाही. त्यात तो कासाविस झाला होता तर वनविभागाने उपचारार्थ यावलला आणले असून योग्य उपचार करून त्यास जंगलात सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे अजगराला पाहण्यासाठी घटनास्थळी व यावल वनविभागात मोठी गर्दी झाली होती.

 

मंगळवारी दहिगाव गावातून सावखेडासिमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यात सकाळी आठ वाजेला शेतमजुरांना एका कोल्ह्याला गिळताना अजगर निर्दशनास पडला. कोल्ह्याची शिकार करताना अजगराच्या डोक्याला तसेच सर्व अंगाला जखमा झाल्या आहत. असगराने कोल्ह्याचा तोंडाचा भाग आधी गिळला. कोल्हा गुदमरून ठार झाला. त्यानंतर असगराने कोल्ह्याला पूर्ण गिळल्यावर अजगर देखील अस्वस्थ झाले.

 

दहिगावातील ए. टी. चौधरी यांनी प्रादेशिक वनविभागाच्या वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांना हा प्रकार लागलीच कळवला. कुटे यांनी उपवनसरक्षक प्रकाश मोराणकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल कुटे हे वनरक्षक बाळासाहेब नलावडे, निंबा पाटील, विलास पाटील, असलम खान या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अर्धवट घशात फसलेल्या कोल्ह्यास काढत जखमी अजगराला यावलला वनविभागाच्या कार्यालयात सुरक्षीत आणण्यात आले. पशुधन अधिकारी डॉ.इंगळे व दहिगावचे पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. तांबे यांनी अजगरावर उपचार केले. उपचाराअंती अजगर पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल कुटे यांनी दिली आहे.

 

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून पाहा... जखमी अजगर आणि मृत कोल्ह्याचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...