आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गडकरींचे \'ते\' वक्तव्य ठरू शकते BJPची डोकेदुखी..सत्तेत येण्यासाठी दिले होते बॅंक खात्यावर 15 लाख जमा करण्‍याचे आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरु केली असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे एक वक्तव्य पक्षाची डोकेदुखी ठरू शकते. गडकरींनी एका मराठी चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने देशातील जनतेला दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांमागील कारणे स्पष्ट केली होती. गडकरींच्या या वक्तव्याचा व्हिडिओही समोर आला होता.

 

काय बोले होते गडकरी..?

'आम्हाला कधीच वाटले नव्हते की,2014 मध्ये देशात आमची सत्ता येईल, त्यामुळे आम्ही आश्वासने देत गेलो', असे गडकरी म्हणाले होते. गडकरी असे नेमके कोणत्या दृष्टीकोनातून बोलले किंवा त्यामागचे कारण काय हे त्यांनाच माहिती. पण गडकरी नेमके यावेळी काय  म्हणाले, हे शब्दांत सांगण्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष त्यांचा व्हिडिओ पाहा...

 

सही फ़रमाया, जनता भी यही सोचती है कि सरकार ने लोगों के सपनों और उनके भरोसे को अपने लोभ का शिकार बनाया है| pic.twitter.com/zhlKTrKHgU

— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2018

 

5 ऑक्टोबर यूट्यूबवर गडकरींचा एक व्हिडिओ अपलोड झाला होता. गडकरींचा हा व्हिडिओ ट्वीट करत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता.

 

राहुल गांधींन शेअर केला व्हिडिओ..
गडकरींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. राहुल गांधी यांनी या व्हिडिओवरून मोदी सरकार कडाडून टीका केली होती. मोदी सरकार खोटे बोलत असल्याचा पुर्नउच्चारही राहुल यांनी केला होता.

 

2014 मध्ये भाजपने दिली होती ही आश्वासने...
2014 मध्ये भाजपने देशातील जनतेला मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली होती, असा आरोप विरोधक करत आहेत. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या बॅंक खात्यावर 15 लाख रुपये डिपॉझिट होतील, प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या जातील, महागाई आणि भ्रष्टाचार नियंत्रणात येईल, अशी मोठी आश्वासने भाजपने दिली होती.

 

बातम्या आणखी आहेत...