Home | Maharashtra | Mumbai | Rain in Nandurbar and Jalgoan Latest Updates

नंदुरबार शहरात पावसाच्या हलक्या सरी...जळगाव, बुलडाणा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

प्रतिनिधी | Update - Nov 19, 2018, 04:59 PM IST

पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची काळी पडण्याची शक्यता आहे.

  • Rain in Nandurbar and Jalgoan Latest Updates

    नंदुरबार/जळगाव/बुलढाणा- राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यात सोमवारी नंदुरबारसह जळगाव, बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाचा पिकांना मोठा फटका बसणार आहे.

    नंदुरबार शहरासह परिसरात सोमवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक पाऊस झाल्याने मिरची व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची काळी पडण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, कोल्हापूर शहराला सोमवारी मध्यरात्री दोन वाजता मुसळधार पावसाने झोडपले. अर्धा तास शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे. रविवारी दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तेव्हापासूनच पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातल्याही अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

    पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

  • Rain in Nandurbar and Jalgoan Latest Updates
  • Rain in Nandurbar and Jalgoan Latest Updates

Trending