आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाहाकार..5 राज्यांत 43 जणांचा मृत्यू, हिमाचलमध्ये IITचे 35 विद्यार्थी बेपत्ता; मनालीचा संपर्क तुटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उत्तर भारतात शनिवारपासून अतिवृष्टी होत आहे. पंजाबसह हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पावसाने आतापर्यंत 5 राज्यात 43 जणांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील आयआयटीचे 35 विद्यार्थी बेपत्ता आहेत. राज्यात वेगवेगळ्या भागात 1600 हून जास्त लोक अडकले आहेत.

 

22 सप्टेंबरपासून IITचे 35 विद्यार्थी बेपत्ता
IIT चे 35 विद्यार्थी बेपत्ता असून 22 सप्टेंबरपासून त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. त्यापैकी एका विद्यार्थ्याचे वडील राजवीर सिंग यांनी न्यूज एजन्सीला सांगितले की, विद्यार्थ्यांचा एक समुह ट्रेकिंगसाठी लाहोल-स्पीतीच्या हम्प्टाजवळ गेला होता. ते सगळे मनालीला परत येणार होते. याभागात हिमवृष्‍टी होत आहे.

 

मनालीचा संपर्क तुटला
मनालीचा जिल्हा मुख्यालय कुलूशी संपर्क तुटला आहे. गेल्या 24 तासांतील पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. मनाली-चंदिगड महामार्गावर रविवारी एक ट्रक व बस वाहून गेली. बियास नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. हवामान केंद्रातील सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, गेल्या 24 तासांत चंबा जिल्ह्यातील डलहौसीमध्ये 170 मिमी, मनाली 121 मिमी, चंबा 117 मिमी, कांग्रा 120.8 मिमी, पालमपूर 108 मिमी, धर्मशाला 62.6 आणि उनामध्ये 62 मिमी पाऊस झाला. राजधानी सिमलामध्ये 23.1 मिमी पाऊस पडला.

 

दरम्यान, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड व काश्मिरात संपूर्ण मान्सूनपैकी 3 दिवसांत 19 टक्के पाऊस झाला आहे. पंजाबमध्ये 3 दिवसांत 112 मिमी (मान्सूनचा 22 टक्के) पाऊस झाला. सर्वाधिक नुकसान हिमाचल व उत्तराखंडात झाले. हिमाचलात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ व दरडी कोसळल्याने कुल्लू-मनालीकडील हायवेसह 378 रस्ते वाहून गेले. उत्तराखंडात चारधाम यात्रा थांबवली. तेथे 48 मार्ग बंद आहेत. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्‍यात आली आहे.

 

हरियाणात 30 लाख एकर पिके उद्ध्वस्त
राज्यात 30 लाख एकरवरील धानाचे पीक उद्ध्वस्त झाले. पंजाबमध्ये कापूस-धानाचे पीक नष्ट झाले. हिमाचलात 470 कोटींचे नुकसान झाले.

 

पंजाबमध्ये पिकांचे मोठे नुकसान
गेल्या 60 तासांतील सलग पावसामुळे पंजाबमधील धान, ऊस, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील धान शेतीचे नुकसान झाले. पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमध्ये जगराओ, मलेरकोटला, संगरूर, मोगा, फतेहगड, पतियाळा आणि जालंधरचा समावेश आहे. धानाचे लवकर उत्पन्न येणारे वाण व व ऊस लोळला आहे. जालंधरमध्ये 1 लाख 70 हजार हेक्टरमध्ये धान व 10 हजार हेक्टरमध्ये ऊस आहे. पाणी एक-दोन दिवस शेतात राहिल्यास पीक हातचे जाईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

अतिवृष्‍टीची 3 कारणे
पहिले: हरियाणा राज्यावर हवेचा कमी दबाव तयार झाला.
दुसरे: अपर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन प्रचंड वाढले.
तिसरे: पश्चिम विक्षोभही सक्रिय झाल्याने तीव्रतेत वाढ झाली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून छायाचित्रांतून पाहा... उत्तर भारतात अतिवृष्‍टीमुळे उडालेला हाहाकार...

बातम्या आणखी आहेत...