आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी, कुठून पाहायचे हे कळत नाही; राज ठाकरेंची खोचक टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इंधनाचे दर सरकारच्या हातात नसतात, असे केंद्रीय मंत्री र‍वीशंकर प्रसाद यांनी मारलेली थाप आहे. जर पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे सरकारच्या हातात नसेल तर भाजपावाले विरोधात असताना आंदोलन का करत होते,  असा सवाल महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी उपस्थित केला. मोदी सरकार थापा मारण्यात पटाईत आहे. नोटबंदी, जीएसटी फसल्यानंतर सरकारने आता थेट जनतेच्या खिशात हात घातल्याचाही आरोप राज यांनी यावेळी केला.

 

काँग्रेस सत्तेत असतानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुनी वक्तव्ये तपासून पाहा,  त्यामुळे देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा, अशा शब्दात राज यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले.

 

शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी- राज ठाकरे

भारत बंदमधून ऐनवेळी माघार घेतलेली शिवसेना दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप राज यांनी केला. शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही, असेही राज म्हणाले. शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली आहे. कुठून पाहायचे हे शिवसेनेला कळत नाही, अशा शब्दात‍ राज यांनी थेट उद्धव ठाकरे यांना निशाना साधला आहे.

 

हगणदारीमुक्त महाराष्ट्र ही देखील सरकारची थाप आहे. मग सकाळी का मोर बसतात का? असा उपाहासात्मक सवालही राज यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...