Home | Maharashtra | Mumbai | Raj Thackeray hits PM Narendra Modi and CM Devendra Fadanvis by his cartoon

लक्ष्मीपूजन..राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींसह भाजप सरकारवर पुन्हा साधला निशाणा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 05:06 PM IST

देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. दुसरीकडे राज ठाकरे मात्र आपल्या व्यंगचित्रातून एकापाठोपाठ धमाके करत आहेत

 • Raj Thackeray hits PM Narendra Modi and CM Devendra Fadanvis by his cartoon

  मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. राज यांनी लक्ष्मीपूजन या शीर्षकाखाली व्यंगचित्र रेखाटून ते फेसबूकपेजवर पोस्ट केले आहे.

  'लक्ष्मीपूजन...बाबांनो गेल्या साडेचार वर्षांत तुम्ही जनतेसमोर 'फेकलेले' हजारो- लाखो- कोटींमधले आकडे ऐकून मीही थक्क झाले!', अशा शब्दांत भाजप नेत्यांनी देशातील जनतेला दिलेल्या फसव्या आश्वासनावरून टोला लगावला आहे.

  दरम्यान, देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. दुसरीकडे राज ठाकरे मात्र आपल्या व्यंगचित्रातून एकापाठोपाठ धमाके करत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या व्यंगचित्रांतून राज यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार चिमटे काढले आहेत.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून केलेले धमाके...

 • Raj Thackeray hits PM Narendra Modi and CM Devendra Fadanvis by his cartoon

  अभ्यंगस्नानाचे व्यंगचित्र
  > महाराष्ट्रातील जनतेची सरकारआणि मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर असलेली नाराजी पाहून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे अभ्यंगस्नानाचे व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात फडणवीस आणि एक व्यक्ती रेखाटला आहे. तो फडणवीसांना 'साहेब...अख्खा महाराष्ट्र तुम्हाला 'धुवायला' आलाय! पाठवू?' असे लिहित फडणवीस यांना चिमटा काढला आहे.

   

  पुढच्या स्लाइडवर पाहा- नरकचतुर्दशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी रेखाटलेले व्यंगचित्र..

 • Raj Thackeray hits PM Narendra Modi and CM Devendra Fadanvis by his cartoon

  नरकचतुर्दशी
  > या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी अमित शहांवर निशाणा साधला आहे. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात 'भाजपाला पडलेले दिवाळी पहाटेचे स्वप्न', अशा शब्दांत  भाजप आणि अमित शहांवर खोचक टीका केली आहे.

   

  पुढील स्लाइडवर पाहा- धनत्रयोदशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी रेखाटलेले व्यंगचित्र

 • Raj Thackeray hits PM Narendra Modi and CM Devendra Fadanvis by his cartoon

  धनत्रयोदशी
  > या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी 'हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो.  वैद्यकीय शास्त्राचा देव धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात!' असे म्हटले आहे. या व्यंगचित्रात त्यांनी भाजप सरकारला धारेवर धरत लिहिले आहे की, 'काळजीचे कारण नाही! परंतु गेल्या चार साडेचार वर्षांत त्यांच्यावर खुपच अत्याचार झालेत! लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर' असे लिहित भाजपचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

Trending