आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे आज साधणार उत्तर भारतीयांशी संवाद; तुम्ही स्वत:ला संविधानापेक्षा मोठे समजता का? भैयांचा सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुम्ही स्वत:ला संविधानापेक्षा मोठे समजता का?
  • हप्ते देऊन मनसे फेरीवाल्यांवरच का हात उचलते?  
  • उत्तर भारतीय माणूस 8 ते 10 हजारांत बारा तास काम करतो.  

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी (दि.2) उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कांदिवली येथील जाहीर कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. तेथे राज काय बोलतात, आपल्या परप्रांतीय भूमिकेचे समर्थन करतात की यूटर्न घेतात, याविषयी देशभरात, खासकरून उत्तर भारतात फार मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

राज यांच्या स्वागताची उत्तर भारतीय महापंचायतीने जय्यत तयारी केली आहे. राज यांनी कोणत्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत, राज यांना तुम्ही काय विचाराल यासंदर्भात महापंचायतीने उत्तर प्रदेशातील जनतेकडून जाहीर प्रश्न मागवले आहेत.   

 
यूपीच्या जनतेने राज यांना विचारलेले हे सवाल...   
1. मुंबईत काही झाले की तुम्ही कार्यकर्त्यांना आम्हाला मारण्या-झोडण्याचे आदेश का देता, मनसेकडूनच नेहमी मारहाण का होते?   
2. संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिक कुठेही नोकरी, व्यवसाय करू शकतो. तुम्ही स्वत:ला संविधानापेक्षा मोठे समजता का?   
3. कल्याणमध्ये रेल्वे भरतीला आलेल्या विद्यार्थ्यांना बेदमपणे मारहाण का करण्यात आली? त्यात त्यांची काय चूक होती?   
4. फेरीवाले पालिका कर्मचाऱ्यांना हप्ते देऊन आपली दुकाने लावतात. तरी मनसे फेरीवाल्यांवरच का हात उचलते?  
5. उत्तर भारतीय माणूस 8 ते 10 हजारांत बारा तास काम करतो. दिवसभर काम करून रात्रपाळीही करतो. मराठी माणूस असे काम करेल का?

बातम्या आणखी आहेत...