आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांचे सपत्नीक कळसुबाई मातेच्या घटकलशाचे विधिवत पूजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी- कळसूबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हासंघटक भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली ट्रेकिंगवीर नवरात्र काळात रोज पहाटे चार वाजता कळसूबाई शि‌खरावर जाऊन विधिवत पूजन व स्वच्छता करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या सौभाग्यवती शर्मीला ठाकरे यांनी कळसुबाई मातेच्या घटकलशाचे विधिवत पूजन करून तो कलश घोटीच्या ट्रेकिंगवीरांच्या हाती दिला आहे.

 

बुधवारपासून (दि.10) सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कळसूबाई शिखरावर ट्रेकिंगवीरांनी परिसर स्वच्छता व रंगरंगोटीचे काम पूर्ण केले. बुधवारी पहाटे चार वाजता विधिवत पूजन झालेल्या कलशाची घटस्थापना येथे केली जाणार आहे. कृष्णकुंज येथे झालेल्या कलशपूजनाच्या वेळी कळसूबाई मित्र मंडळाचे अभिजित कुलकर्णी, रामदास आडोळे, दीपक चव्हाण, आत्माराम मते, अशोक हेमके, प्रशांत जाधव, प्रवीण भटाटे, संतोष म्हसने, बालाजी तुंबरे, सोपान चव्हाण, प्रशांत येवलेकर, गजानन चव्हाण, नीलेश पवार, बाळू आरोटे, दीपक बेलेकर आदी मनसे पदाधिकारी व गिर्यारोहक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...