आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर रिपाइंकडून लोकसभा लढवावी; रामदास आठवले यांनी उदयनराजे भोसले यांना दिली ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं-आठवले गट) नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना ऑफर दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधाचे सूर आहेत.

 

उदयनराजे यांना सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी रिपाइंकडून लढावे, असे रामदास आठवले यांनी मुंबईत एका कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. 

 

उदयनराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळण्याची शक्यता तशी धूसरच आहे. श्रीनिवास पाटील यांचे नाव आघाडीवर असून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उदयनराजे यांना रिपाइंमध्ये येण्याची आम्ही विनंती करणार आहे. एवढेच नाही तर उदयनराजे यांना आम्ही निवडून आणू, असा दावा आठवले यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...