आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरकुरे देण्याच्या बहाण्याने 3 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पाषाण परिसरातील सोमेश्वरवाडीत खाऊ देण्याच्या बहाण्याने तीनवर्षीय मुलीवर तिच्या ओेळखीतील तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शंभुकुमार दुखी राय (21, बिहार) नामक तरुणास अटक केली आहे. 

 

शनिवारी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घराजवळ खेळत होती. त्यावेळी तिच्या गावाकडील ओळखीच्या शंभुकुमारने तिला कुरकुरे खाण्यास दिले आणि त्या भागातील वृध्दाश्रमामागील झुडूपात नेले. तिथे तिला मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कारही केला. त्यानंतर तिला घटनास्थळी टाकून आरोपी पळून गेला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर चतृश्रृंगी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...