आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यंत घृणास्पद..संस्थाचालकाकडून आश्रमशाळेतील 5 मुलींवर लैंगिक अत्याचार; जमावाकडून शाळेत तोडफोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- सांगली जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वाळवा तालुक्यात एका आश्रमशाळेतील 5 मुलींवर संचालकाने लैंगिक अत्याचार केला आहे. कुरपळ येथील मिनाई आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी शाळेचा संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद पवार असे नराधमाचे नाव आहे. संतप्त जमावाने शाळेची तोडफोडही केली आहे. गावकर्‍यांनी गुरुवारी पोलिस स्टेशन आणि आश्रम वसतिगृहावर मोर्चा काढला.

 

पोलिस सुत्रांनुसार, आरोपी अरविंद पवार याला अटक केली आहे. आरोपीने आश्रमशाळेतील 5 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या कामात मदत करणार्‍या मनिषा कांबळे नामक महिला शिपाईलाही ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित मुलींनी आश्रमशाळेतल्या संस्थाचालकांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत पालकांना सांगितले होते. त्यानंतर हे प्रकरण उघड झाले. आश्रमशाळेतील मुलींवर आरोपीने अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलींनी पोलिसांना सांगितले. या घटनेबाबत मुलींच्या पालकांनामधून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...