आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवाचीवाडीत विवाहीतेवर अत्याचार... सासर्‍याच्या समाधीवर दिवा लावायला गेली होती महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज- सासऱ्याच्या समाधीवर दिवा लावण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका नाराधमाने अत्याचार केल्याची घटना केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी शनिवारी दुपारी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जिवाचीवाडी येथील एक महिला आपल्या कुटुंबासह शेतात राहत असून बुधवारी रात्री ती  आठच्या सुमारास  सासऱ्याच्या समाधीवर दिवा लावण्यासाठी गेली असता. तिच्यावर पाळत ठेवत ज्ञानोबा गोपाळ चौरे याने महिलेवर अत्याचार केला. महिलेचा मुलगा शेतातून घराकडे येत असताना त्याने हा प्रकार पाहतचा  आरडाओरडा केली. तेव्हा चौरे याने हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या मुलाला जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन पलायन केले. शनिवारी दुपारी महिलेने पतीसह पोलिस स्टेशन गाठून दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानोबा गोपाळ चौरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शयामकुमार डोंगरे हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...