आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेस गुंगीचे औषध पाजून तिच्या मुलासमोरच तिच्यावर केला अत्याचार, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिच्या मुलासमोरच तिच्यावर अत्याचार करणार्‍या नराधमाला गुरुवारी (दि.15) पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (दि. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.के. कुरंदळे यांनी दिले. चरण प्रेमसिंग सोणावले (25, रा.शुलीभंजन, ता.खुलताबाद) असे नराधमाचे नाव आहे.

 

प्रकरणात 24 वर्षीय विवाहीत पीडितेने तक्रार दिली. तक्रारीत, पीडितेचे लग्न झाले असून पीडितेचा पती मोक्काच्या खटल्यात मागील तीन वर्षांपासून हर्सुल जेलमध्ये आहे.पीडितेला एक मुलगी व मुलगा आहे. पीडिता व आरोपी हे लहानपणापासून ओळखीचे असून आरोपी हा पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता.

 

दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी पीडिता दिवाळीनिमित्त दोन्ही मुलांसह माहेरी आली होती. 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास पीडिताही मुलाला घेऊन गारखेडा परिसरात राहणार्‍या भावाकडे भाऊबिजसाठी आली होती. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पीडिता मुलाला घेऊन पतीवरील दाखल दोषारोपपत्र आणण्यासाठी जिल्हा कोर्टात पायी जात होती. तेव्हा दर्गा रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयाजवळ आरोपी चरण सोणावले हा कार घेऊन तेथे आला. त्याने पीडितेला मी कोर्टात सोडतो, असे सांगत त्यांना गाडीत बसविले. गाडीत बसल्यानंतर त्याने पीडितेला व तिच्या मुलाला बाटलीतील पाणी पिण्यासाठी दिले. तेव्हा पीडिता व तिचा  मुलगा बेशुद्ध झाले. पीडितेला शुद्ध आली असता ती एका मोडक्या घरात, अंधार्‍या खोलीत होती. तेथे आरोपी सोणावाले म्हणाला, 'तू जास्त शहाणपणा करते, माझ्याशी बोलत नाही. तुझ्या भावाने मला टीकावने मारले, मी तुझी वर्षभरापासून वाट पाहतोय', असे म्हणत शिविगाळ केली. त्यावेळी पीडितेचा मुलगा देखील तेथे होता. पीडितेने आरडा-ओरड केली, मात्र, आरोपीने मुलाला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडितेला दोरीने बांधून तिला बेदम मारहाण केली.  मुलाच्या समोरच पीडितेवर अत्याचार केला. त्यामुळे पीडिता बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर पीडितीने पिण्यासाठी पाणी मागितले. आरोपी पाणी आणण्यासाठी गेला असता पीडितेच्या गळ्यातील सोन्याची पोत व चांदीचे जाडवे चोरीला गेल्याचे लक्षात आले. पीडितेने मुलाला घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांना पकडले. त्यानंतर आरोपीने शिऊर बंगल्याजवळील एका रुग्णालयात पीडितेला उपचारासाठी नेले. तेथून पीडितेला आरोपीने वरझडी येथील आत्याच्या घरी आणले. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आरोपीने पीडितेला तिच्या माहेरी आणून सोडले. पीडितेने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला.

 

या प्रकरणात आरोपीविरुद्ध जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्रध्दा वायदंडे यांनी तपास करुन आरोपी सोणावले याला शनिवारी अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी आरोपी हा गंड प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात गावातील लोकांनी देखील पोलिस ठाण्यात तक्रारी केलेल्या आहेत. त्याने पीडितेला मारहाण करुन अत्याचार केला आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करणे आहे. पीडित महिलेवर कोणत्या ठिकाणी अत्याचार केला याचा तपास करणे आहे.

 

पीडितेला मारहाण करण्यात आलेला बेल्ट, काठी, परशीचा तुकडा जप्त करणे आहे. आरोपीने पीडितेची चोरलेली पोत व जोडवी जप्त करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टाकडे केली. विनंती मान्य करुन कोर्टाने आदेश दिले.

 

बातम्या आणखी आहेत...