आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inspiring: KFC मध्ये नोकरीसाठी पोहोचले होते 24 जण, 23 ची निवड झाली; रिजेक्ट झालेला एकटा मीच होतो -जॅक मा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Alibaba चे संस्थापक Jack Ma यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. 10 सप्टेंबरला 54 वर्षांचे होत असताना आपल्या वाढदिवशी ते रिटायर होत आहेत. जॅक मा केवळ चीन नव्हे, कर आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या यादीनुसार, त्यांच्याकडे 40 अब्ज अमेरिकन डॉलर (2.88 लाख कोटी रुपये) इतकी नेटवर्थ आहे. तर त्यांची कंपनी अलीबाबाची व्हॅल्यू 420 अब्ज  अमेरिकन डॉलर झाली आहे. ऐकूण आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे की आशिया खंडातील सर्वात धनाढ्य असलेले जॅक मा विद्यापीठ परीक्षांमध्ये 2 वेळा नापास झाले होते. तसेच नोकरीसाठी त्यांनी तब्बल 30 वेळा प्रयत्न केला आणि सर्वांनी त्यांना नोकरी देण्यास नकार दिला. 


रिजेक्शनने दिली बिझनेसमन होण्याची प्रेरणा...
> जॅक मा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, की त्यांनी एक दोन नव्हे, तर तब्बल 30 ठिकाणी नोकरीसाठी आवेदन दिले होते. परंतु, कुठे लायक नाहीस म्हणून तर कुठे गुंड समजून नोकरी नाकारण्यात आली. काही ठिकाणी तर कारणही सांगण्यात आले नाही. 
> जॅक मा यांना एकदा त्यांच्या चुलत भावामुळे नोकरी मिळाली नाही. चीनच्या एका 4 स्टार हॉटेलमध्ये वेटरसाठी जागा निघाल्या होत्या. त्यांनी आणि त्यांच्या एका चुलत भावाने मुलाखतीसाठी 2 तास रांगेत काढले. यानंतर झालेल्या मुलाखतीमध्ये चुलत भावाचा स्कोर कमी होता. तरीही त्याची निवड झाली आणि जॅक मा यांना रिजेक्ट करण्यात आले. एवढेच नव्हे, तर त्यांनी हार्वर्ड बिझनेस यूनिव्हर्सिटीत प्रवेशासाठी 10 वेळा अर्ज पाठवला आणि एकदाही होकार मिळाला नाही.
> त्यांनी KFC फूड चेनचा एक गंमतीशीर किस्सा देखील सांगितला होता. जॅक मा नोकरीच्या शोधात असताना त्यांच्या शहरात KFC फूड चेनचे नवीन ब्रांच उघडले होते. तेथे नोकरी मिळणार या अपेक्षेने त्यांनी प्रयत्न केला. नोकरीसाठी एकूण 24 जण पोहोचले होते. त्यापैकी 23 जणांची निवड झाली आणि निवड नाही झालेली एकमेव व्यक्ती जॅक मा होते. रिजेक्शनने आपल्याला स्वतःचे बिझनेस सुरू करण्याची प्रेरणा दिली असे जॅक मा सांगतात. 

 

1999 मध्ये रोवला अलीबाबा पाया
21 फेब्रुवारी 1999 रोजी जॅक मा यांनी अलीबाबाची स्थापना केली. यासाठी त्यांनी आपल्या 17 मित्रांना तयार केले. पाचवीतच दोनदा नापास झालेले जॅक मा, आठवीत तर 3 वेळा नापास झाले होते. वेबसाइट सुरू केल्यानंतरही त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. जॅक मा यांनी ज्या अपार्टमेंटधून ही वेबसाइट सुरू केली होती. त्या ठिकाणी राहणारे शेजारी जॅक यांना समाजकंट समजून वाकड्या नजरेने पाहायचे. काही वर्षांनंतर जेव्हा ही कंपनी देशात आणि जगात लोकप्रीय झाली तेव्हा लोकांनाही कळाले की हा समाजकंटक नाही तर आपले सर्वांचे आयुष्य सहज करणारा आशिया खंडातील सर्वात धनाढ्य उद्योजक आहे.

 

बातम्या आणखी आहेत...