आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधानोरा- चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात आलेल्या संदलमध्ये झेंडा फिरवण्यावरुन झालेल्या वादातून दंगल उसळली. दरम्यान जमावाने एका महिलेसह तिच्या पतीला घरात घुसून बेदम मारहाण केली.
मिळालेली माहिती अशी की, ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी बिडगावात तडवी बांधवांनी संदल काढली होती.त्या मिरवणुकीत झेंडा फिरवला जात होता.लहान मुलगा हा झेंडा फिरवत असताना गावातील कैलास बोमटू पाटील यांना डोक्याला तो लागला. त्यावर कैलास पाटील यांनी झेंडा व्यवस्थित फिरविण्याच्या सुचना संबंधित मुलाला केली. मात्र, मिरवणूक संपल्यानंतर पंचवीस ते तीस जण अचानक कैलास पाटील यांच्या घरात घुसले. कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी अडावद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गा विसर्जन मिरवणुकीत उसळली होती दंगल..
दरम्यान, यापूर्वी 2002 व 2012 मध्ये दुर्गा विसर्जन मिरवणुकीत बिडगाव येथे दंगल उसळली होती. विशेष म्हणजे बिडगावला 2014-15 चा तंटामुक्तीचा आदर्श पुरस्कार मिळालेला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा..संबंधित फोटो..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.