Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Robbery On Varanasi Mysore Express Near Solapur

क्रॉसिंगसाठी थांबलेल्या वाराणसी-म्हैसूर एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे लाख रुपयांचे सोने लुटले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 05:36 PM IST

वाराणसीहून मैसूरला जाणाऱ्या एक्सप्रेसवर केम स्थानकावर दरोडा पडला. अज्ञात चोरट्यांनी प्रवाशांकडून सुमारे एक लाख रुपयांचे

  • Robbery On Varanasi Mysore Express Near Solapur

    सोलापूर- वाराणसीहून मैसूरला जाणाऱ्या एक्सप्रेसवर केम स्थानकावर दरोडा पडला. अज्ञात चोरट्यांनी प्रवाशांकडून सुमारे एक लाख रुपयांचे सोने लुटले. ही घटना रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली.

    वाराणसी-मैसूर एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी थांबली होती. अज्ञात 10 ते 15 दरोडेखोरांनी 'एस 7' व 'एस 8' ह्या डब्यावर हल्ला चढविला. प्रवाशांकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे सोने व मोबाईल लुटण्यात आले. प्रवाशानी गाडीतील तिकिट पर्यवेक्षक ब्रिजभूषण यांच्याकडे तक्रार दिली. वाडी लोहमार्ग पोलिस यांच्याकडे या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

Trending