Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Sachin Andure Was Absent At Work on the day of dr Narendra Dabholkars Murder

डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी नवी माहिती... 'त्या' दिवशी आरोपी सचिन अंदुरे कामावर गैरहजर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 01, 2018, 06:52 PM IST

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.

  • Sachin Andure Was Absent At Work on the day of dr Narendra Dabholkars Murder

    औरंगाबाद- अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली त्या दिवशी आरोपी सचिन अंदुरे हा कामावर गैरहजर होता. सचिन अंदुरे हा औरंगाबादेतील निराला बाजारातील एका कापड दुकानात कामाला होता. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात दाभोलकरांची हत्या झाली, त्या दिवशी सचिन कामावर गैरहजर होता. तसेच 19 ऑगस्ट रोजी त्याची साप्ताहिक सुटी होती.

    मिळालेली माहिती अशी की, सचिन अंदुरे सध्या सीबीअायच्या ताब्यात आहे. सीबीआयने सचिन काम करत असलेल्या दुकानातील हजेरी रजिस्टर जप्त केले आहे. त्यात सचिन अंदुरे हा 20 ऑगस्टला ज्यादिवशी दाभोलकरांची हत्या झाली, त्यादिवशी कामावर नसल्याची नोंद आहे.

Trending