आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकल मराठा समाज दिवाळीच्या मुहूर्तावर स्थापन करणार राजकीय पक्ष; कोल्हापुरात घेणार मेळावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- सकल मराठा समाजाने राजकीय पक्ष स्थापन करण्‍याचा न‍िर्णय घेतला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात नव्या पक्षाची स्थापना करण्‍यात येणार आहे. विशेष म्हणजे पक्षस्थापनेच्या संदर्भात कोल्हापुरात मराठा समाजाचा मेळावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

मिळालेली माहिती अशी की, आरक्षणासह विविध मागण्यासाठी राज्यभर आंदोलन करणार्‍या मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झाले आहे. आपल्या मागण्या आता राजकीय मार्गाने पूर्ण करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.

 

समाजबांधवाचे मत जाणून घेणार

मराठा समाजाच्या हक्कांसाठी स्वतंत्र राजकीयपक्ष असावा काय, यासंदर्भात समाजबांधवांची मते जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी मराठा समाज समन्वयक राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. बुधवारी कोल्हापूर या दौर्‍याला सुरुवात झाली आहे. समाज मेळाव्याच्या मुद्यावर एकमत झाल्यानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्‍याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

 

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी राजभरात एकूण 58 मराठा मोर्चा काढण्यात आले. तरीही सरकारने दखल न घेतल्याने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...