आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडहून गणेशोत्सवासाठी आलेल्या तरुणीवर शॉपिंग मॉलच्या चेंजिंग रूममध्ये दुष्कर्म करण्‍याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सीताबर्डी परिसरातील एका शॉपिंग मॉलच्या चेंजिंग रूममध्ये महिला पर्यटकासोबत दुष्कर्म करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मॉलमधील एका सेल्समनला अटक केली आहे. जयसिंग असे आरोपीचे नाव आहे.

 

पीडित तरुणी आपल्या पुरुष मित्रासोबत गणेशोत्सवासाठी थायलंडहून नागपूर शहरात आली आहे. पीडिता शॉपिंग मॉलमध्ये ड्रेस खरेदी करण्‍यासाठी गेली. ड्रेसची फिटिंग व्यवस्थित नसल्याने पीडितेने सेल्समनला बोलावले. यादरम्यान आरोपी जयसिंग याने पीडितेसोबत अश्लिल वर्तन करण्यास सुरुवात केली. पीडिता घाबरली आणि तिने आरडाओरड केली. मित्राला हा प्रकार सांगितला. तिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जयसिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणी टूरिस्ट व्हिसावर 10 सप्टेंबरला भारतात आली होती.

बातम्या आणखी आहेत...