आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान आणि सुशांतला डान्स शिकवणारी कोरियोग्राफरच निघाली सेक्स रॅकेटची मास्टर माइंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डान्स शिकविण्याच्या नावाखाली मॉडल आणि स्ट्रगलिंग अॅक्ट्रेसला देहविक्रीसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका महिला कोरियोग्राफरला अटक केली आहे. अॅग्नेस हेमिल्‍टन (56) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तरुणींना खाडी आणि आफ्रिकन देशात सप्लाय करत होती, असाही आरोप अटक करण्‍यात आलेल्या महिलेवर करण्‍यात आला आहे.

 

सलमानलाही शिकवला आहे डान्स..

सुपरस्टार सलमान खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यासह अनेक बॉलिवूड अॅक्टर आणि अॅक्ट्रेसेसला डान्स शिकविल्याचा दावा अॅग्नेस हेमिल्टन हिने केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. अॅग्नेस हिने प्रभुदेवा आणि गणेश आचार्यला असिस्ट केले होते. अॅक्ट्रेस डेजी शाह हिलाही कोरियोग्राफी शिकविल्याचे अॅग्नेस हिने सांगितले आहे.

 

महिला डान्सरवर हे आहेत आरोप..

आरोपी महिला मुंबईत डान्स क्‍लासेस चालविते. तिच्या क्लासमध्ये बॉलिवूडमधील अनेक चर्चित चेहरे येतात. डान्स क्लासला येणार्‍या तरुणींना ती देहविक्रीसाठी प्रवृत्त करते. अनेकदा तिने तरुणींना खोटे सांगून कॉन्सर्टच्या नावाखाली विदेशात पाठविले होते. त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडले होते. पोलिसांनी आरोपी महिलेकडून अनेक आक्षेपार्ह क्लिप आणि दस्ताऐवजही जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

 

असा झाला सेक्स रॅकेटचा भंडाफोड...

अॅग्नेस ही भारत आणि मलेशियादरम्यान कायम प्रवास करते. तिथे ती विदेशी नेटवर्कच्या गाठीभेटी घेते. नंतर ‍ती मागणीनुसार मुंबईहून तरुणींना पाठवत होती. अॅग्नेेसने रजिया पटेल नावक एका तरुणीला कंसर्टसाठी केनियामध्ये पाठविले होते. रजिया ही केनियात पोहोचल्यानंतर ‍तेथील एका महिलेने तिला नैरोबीमध्ये घेऊन गेली आणि तिला देहविक्रीसाठी प्रवृत्त करण्‍याचा प्रयत्न केले. परंतु रजियाने विरोध केल्यास तिला नार्कोटिक्स प्रकरणात अडकविले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. सेक्स रॅकेटच्या मास्टर माइंडसोबतचे बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...