Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Sambhaji Bhide got bail in Controversial Statement of Mango

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते..वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भिडे गुरुजी यांना जामीन मंजूर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 03:49 PM IST

आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला होता.

 • Sambhaji Bhide got bail in Controversial Statement of Mango

  नाशिक- वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना शुक्रवारी नाशिक कोर्टाने जामीन मंजूर केला. पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्‍यावर भिडे यांची कोर्टाने जामिनावर सुटका केली. दरम्यान, 'माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते', असे वक्तव्य भिडे गुरुजींनी नाशिक येथे झालेल्या एका सभेत केले होते.

  भिडेंनी कोर्टात मांडली आपली बाजू..
  वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी आधी 4 सुनावणी झाली. मात्र, संभाजी भिडे सुनावणीला हजार झाले नाही. कोर्टाने वारंवार हजर राहण्याचे आदेश देऊनही ते अनुपस्थित राहात होते. अखेर शुक्रवारी भिडे गुरुजी कोर्टात उपस्थित होते. त्यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.

  माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुले झाली- भिडे गुरुजी
  भिडे यांनी नाशिक येथे झालेल्या एका सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले दिले होते. सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर त्यांना जोरदार प्रहार केला होता. तसेच आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला होता.

Trending