आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook वर केले अनफ्रेंड..माथेफिरूच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिकाचा अखेर मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- 'फेसबुक' रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने माथेफिरू रोहित हेमलानी याने टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सानिका प्रदीप थुगांवकर ‍हिच्यावर चाकू हल्ला केला होता. अखेर सानिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील पावणेतीन महिन्यांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. आरोपी रोहितने सानिकाच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केले होते.

 

सानिका शिक्षण घेत असताना शहरातील  अशोका हॉटेलसमोरील एका फायनान्स कार्यालयात काम करत होती. एक जुलैला रात्री 7 वाजून 45 मिनिटांला आरोपी रोहित तिच्या कार्यालयाजवळ गेला आणि सानिका कार्यालयातून बाहेर येताच तिच्यावर चाकूने सपासप वार केले होते.  छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने सानिका गंभीर जखमी झाली. तिला तातडीने खामल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. सानिकाच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. तरीही तिच्या आई-वडिलांनी पावणेतीन महिन्यात होते नव्हते विकून तिच्यावर उपचार केला. सानिकाच्या उपचारावर जवळपास 25 लाख रुपये खर्च केले. तरीही सानिकाचा जीव वाचू शकला नाही.

 

एकतर्फी प्रेमातून मित्रानेच केला होता हल्ला
खामल्यातील सिंधी कॉलनीत राहाणारा आरोपी रोहित हेमनानी आणि सानिकाचे दोन वर्षांपासून मित्रत्वाचे संबंध होते. त्याचे स्वत:चे मोबाइल शॉप आहे. काही दिवसांपूर्वी त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात आल्याने सानिकाने त्याच्यासोबतची मैत्री तोडली होती. एवढेच नाही तर त्याला फेसबुकवरही अनफ्रेंड केले होते. त्यामुळे संतापल्या रोहितने सानिकावर चाकू हल्ला केला होता. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपीने सानिकावर हल्ला केल्याचे चौकशी अंती समोर आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सानिका आणि आरोपी रोहितचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...