आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर...\', लक्ष वेधून घेतात \'ठाकरे\' चित्रपटातील हे 8 डायलॉग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्क: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तिरेखा वठवली आहे. तर अभिनेत्री अमृता राव बाळासाहेबांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत रिलीज करण्यात येणार आहे. ट्रेलरदेखील दोन्ही भाषेत रिलीज करण्यात आला असून त्यामधील सीन्स आणि डायलॉगही वेगळे आहेत. हिंदी चित्रपटात नवाजुद्दीनचाच आवाज ठेवण्यात आला असून मराठीसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज वापरण्यात आला आहे. 

 

हिंदीसह मराठी ट्रेलरमध्येही दमदार डायलॉग्ज ऐकायला मिळत आहेत. 'ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर...' हा संवाद असो किंवा 'माणसाची किंमत छाती किती इंचाची आहे यावर ठरवत नसतात…ताकद मेंदूत असते' असे एकाहून एक दमदार डायलॉग चित्रपटात आहेत.

 

खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी 'ठाकरे' या चित्रपटाच्या मराठी ट्रेलरमधील दमदार डायलॉगची मेजवानी घेऊन आलो आहोत... 

 

बातम्या आणखी आहेत...