आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघांच्या सुरक्षेसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 1 डिसेंबरपासून मोबाइल फोन बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी जाणारे पर्यटक, जिप्सीचालक आणि गाईड्सना 1 डिसेंबरपासून मोबाइल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन आर प्रवीण यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यात वन विभागाने नमूद केले आहे की, व्याघ्र प्रकल्पात पर्यटक सफारी दरम्यान मोबाइल वा स्मार्टफोनच्या वापरामुळे वाघ आणि बिबट्याचे लोकेशन जगजाहीर होते. अनेक पर्यटक वाघांच्या लोकेशनच्या लिंक पाठवतात. त्यामुळे वाघांच्या जीवाला शिकाऱ्यांकडून धोका निर्माण होतो. सफारीचा वेळी पर्यटक आणि जिप्सीचालक एकमेकांशी संपर्क साधून त्यांना वाघांचे, बिबट्याचा ठावठिकाणा कळवतात. परिणामी इतर जिप्सीचालक त्या ठिकाणी वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण होते. अनेक पर्यटक सेल्फीचे प्रयत्न करतात. त्यामुळे वाघ-बिबट्यांच्या अधिवासावर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सफारी दरम्यान मोबाइल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. यात पर्यटक किंवा जिप्सीचालक मोबाइल फोन बाळगून आढळल्यास कारवाई होणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...