आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI च्या अकाऊंटला मोबाइल नंबर रजिस्टर करणे बंधनकारक; 1 डिसेंबर अंतिम मुदत, अन्यथा ही सुविधा बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोबाइल क्रमांक जोडणी बंधनकारक केली आहे. मोबाइल क्रमांक खात्याशी जोडला नाही तर या ग्राहकांची नेट बँकिंग सुविधा बंद केली जाऊ शकते.

ग्राहकांना मोबाइल क्रमांक नोंदणीसाठी आपले खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. आपला मोबाइल क्रमांक खात्याशी जोडला गेलेला आहे की नाही याची पडताळणी ग्राहक एसबीआय.डॉट कॉमवर करू शकतील.

 

ग्राहकांना एसएमएस आणि इ-मेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक रजिस्टर करायला सांगावा, असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 6 जुलै 2017 रोजी एका निवदनाद्वारे बँकांना दिले होते. त्यानुसार एसबीआयने ऑनलाईन बँकिंगक वेबसाइटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

 

अशी करता येईल पडताळणी
- ऑनलाइनएसबीआय डॉट कॉमवर जा.
- युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर ‘माय अकाऊंट प्रोफाईल’ टॅबवर क्लिक करा.
- यानंतर ‘पर्सनल डिटेल्स/ मोबाइल’वर क्लिक करा.
- प्रोफाइल पासवर्ड एंटर केल्यानंतर आपला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल नोंद असेल तर तो दिसेल.

 

बातम्या आणखी आहेत...