आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण.. 8 डिसेंबरपर्यंत आरोपपत्र सादर करा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांच्याविरुद्धचे आरोपपत्र मराठीत आहे

मुंबई- कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटकेतील कार्यकर्त्यांविरुद्ध पुणे न्यायालयात दाखल आरोपपपत्र 8 डिसेंबरपर्यंत आपल्या समक्ष सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. आरोपी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांच्याविरुद्धचे आरोपपत्र मराठीत आहे.

 

सरकारला 8 डिसेंबरपर्यंत त्याचा इंग्रजीत अनुवाद कोर्टाला द्यावा लागेल. या आरोपींवर काय आरोप लावले आहेत, हे कोर्टाला पाहायचे आहेत. प्रकरणाची पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होईल.

 

महाराष्ट्र सरकारकडून सोमवारी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध करत सांगितलेे की, त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तांत्रिक आधारावर त्यांना जामीन दिला जाऊ नये. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विचारले की, त्यांच्यावर कोणते अारोप आहेत. मराठीतील आरोपपत्राचा उल्लेख केल्यानंतर कोर्टाने त्याचा इंग्रजी अनुवाद सादर करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...